हिवाळ्याची चाहूल
हिवाळ्याची चाहूल
सूर्योबा राहीले डोंगरा मागे झोपून,
मऊ मऊ रजईत बसले लपून
पिवळ्या पिवळ्या फुलांनी रानं सजली,
शिंपडलेल्या सड्यात पायवाट भिजली
रंग फुलांचे पाकळ्यांत मिटले,
निळ्या आभाळात दवबिंदू दाटले
झाडांचा पर्णसंभार लागला उतरू,
धुक्याचा वारू लागला उधळू
खळखळ ओढा गोठायला लागला,
गारव्याचा रंग पसरायला लागला
थंडीचा पारा लागला घसरू,
बर्फाची चादर लागली पसरू
अलगद पडले थंडीचे पाऊल,
जाणवायला लागली हिवाळ्याची चाहूल
