पवित्र प्रेमाचे अतूट नाते
पवित्र प्रेमाचे अतूट नाते
एक नातं विश्वासाचं,
एक नातं प्रेमाचं,
एक नातं जिव्हाळ्याच,
एक नात मायेचं.
सगळी नाती एकाच रूपात,
भाऊ बहिणीच्या सुंदर नात्यात ,
कधी भांडण कधी मेळ,
कधी मारामारी कधी खेळ .
नातं असं की ,
ज्याला वयाचं नाही बंधन,
भावाचं प्रेम बहिणीची माया,
तशीच राहते चिरंतन .
बहीण असो लहान वा मोठी,
तिची माया कधीच नसते खोटी,
असते तीला नात्याची जाण,
भाऊ तिचा जीव कि प्राण .
तुझं माझं जमेना,
तुझ्या वाचून गमेना ,
तरी दोघांमध्ये प्रेमाची एक घट्ट रेघ,
हीच असते या नात्याची खरी मेख.
राखीच्या एका कच्च्या धाग्यात,
जन्मभर बांधलेलं पक्क नातं,
आयुष्यभर असच घट्ट राहतं,
पवित्र प्रेमाचे अतूट नातं. ..
