STORYMIRROR

Varsha Shidore

Classics Inspirational

4  

Varsha Shidore

Classics Inspirational

महाराष्ट्र गौरव...

महाराष्ट्र गौरव...

2 mins
23.3K

बोलबाला असला कित्येक प्रांतियांचा

आग्रह झाला होता एका मराठी बोलीचा 

१९५६ ला भाषावार राज्य निर्माण करून

मिरविला शेला अफाट कौतुकी शैलीचा...


महाराष्ट्र माझा संपन्न अशा माय भूमीचा 

गौरव इथे होई अनेकानेक कलागुणांचा 

जिथे आज गाजतो नित्य मधुर पोवाडा 

विविध भाषांच्या रूढी नि परंपरांचा... 


कितीतरी महामानवी व्यक्तिमत्वे इथे

जन्मली रक्तरंजित इतिहास कुशीत

सह्याद्रीचा डोंगर माणुसकीचा कडा 

खुले बंधुभावाचे बीज, उमलून खुशीत...


जाती, धर्म, वर्ग बहुविध नांदतात सोबत 

पर्वतरांगा, नद्या, गड-किल्ल्यांचा वारसा 

मिटवतात मनामनातील कुंठित दुरावा

निसर्ग सौंदर्याचा भुलवणारा हा आसरा... 


प्राणी अभयारण्यांचा नि जंगल वनांचा 

एकत्रित संग्रहालयांचा चाखावा मेवा 

संग्रहित ग्रंधसंपदा नि थोर साधुसंतांचा 

उत्कृष्ट लोककलेच्या संस्कृतीचा ठेवा... 


विकासाच्या संकल्पनेत मुरता मुरता 

झाली औद्योगिक क्षेत्रांची खूप भरभराट

राष्ट्र-राज्याची पवित्रता अजूनही टिकून

नसावी अंतरी मिटण्याची उगा घबराट... 


प्रगतीपथावर महाराष्ट्राची वाटचाल

लोकशाहीच्या दौलतीची राखते शान 

समता, स्वातंत्र्य, शिक्षण, हक्क अशा 

अधिकारांचा उंचावेल राज्य सदा मान... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics