एक दुर्गोत्सव स्वतःपासून
एक दुर्गोत्सव स्वतःपासून
दुर्गोत्सव करायचा तर मनापासून करा,
उत्सवाची सुरवात प्रथम आपल्या घरापासून करा
असतात देवींची सगळी रूपं ,आपल्या पण घरात,
आदिमाया आदिशक्ती फरक नसतो त्यात
देवळात देवीची मनोभावे पूजा,
मग वास्तवातील देवीला न्याय का दुजा
काही नाही मागत ती ,दोन शब्द प्रेमाचे फक्त
नको अपमान तिचा, करा आदर व्यक्त
तीच असते आई,बहीण,मुलगी,आजी, सहचारिणी ,
मायेच्या व्यक्तींना त्रास होता तीच होते रणरागिणी
परस्त्री माते समान असू द्यावं ध्यानात,
आपल्याही घरात आई बहीण हे असू देऊ मनात
घरी बाहेर सगळीकडे करु फक्त आदर,
कुठल्याच माता भगिनींचा नको आता अनादर
नको बंधने मुलींवर त्यांना घेऊ दे मोकळा श्वास,
जगू दे त्यांना खरंखुरं, नको फक्त जगण्याचा आभास
आपलंच अनुकरण करणार पुढची पिढी,
मुलगा मुलगी समानतेची आपणच उभारू गुढी
दिवा पणती समानता ,आपणच आता ठरवू ,
संस्कारांनी आदर्श अशी ,पुढची पिढी घडवू....
