मुखवटे आणि चेहरे
मुखवटे आणि चेहरे
मुखवटे आणि चेहरे,
चेहेरे आणि मुखवटे,
असली आणि नकली,
रंगच जास्त गहिरे
आयुष्याचा रंगमंच ,
वेगवेगळ्या भूमिका,
वेगवेगळी नाती,
भूमिका बदलत जाती
बदलते संवाद ,
बदलता रंगमंच,
एक चूक,
आणि नात्याचा कायम चा अंत
रंगमंचावर आयुष्याच्या,
चुका सुधारता येत नाहीत,
कारण गेलेले क्षण कधी ,
परत फिरून येत नाहीत
आयुष्यातली प्रत्येक भूमिका,
खंबीरपणे वठवावी लागते,
कधी पडत कधी धडपडत,
विचारपूर्वक निभवावी लागते
आयुष्याचा रंगमंच,
आणि नाटकाचा रंगमंच,
फरक जमीन अस्मानाचा,
असली नकली पणाच्या ,
मुखवटा आणि चेहऱ्याचा.....
