रिते मन
रिते मन
1 min
185
मनात होतं खूप काही,
बोलता कधी आलच नाही,
शब्द-शब्द जोडून सुद्धा,
वाक्य कधी जुळलंच नाही.
सान्गायचे होते काही,
मात्र बोलले गेलेच नाही,
साचून साचून सारे राही,
विचारांच ओझं होई.
बोलण्या सारखे खूप होते,
सांगण्या सारखे खूप होते,
पण वेळ जेंव्हा आली ,
तेंव्हा,
मन मात्र रिते होते!!!
