मनाचे जाळे
मनाचे जाळे
विसरणं तर शक्य नाही ,
मग आठवायला काय हरकत आहे .
पण आठवण्यासाठी सुद्धा ,आधी विसराव लागत,
हे कुठे कळतं आहे.
एकात एक अडकत जाऊन,
फक्त गुंता वाढतो आहे .
एक टोक पकडलं तर,
दुसरं टोक सुटतं आहे.
बाहेर येण्याच्या प्रयत्नात,
अधिक अधिक खोल रुतत आहे.
पण मन मात्र अविरत,
त्याच काम करतच आहे,
पुन्हा पुन्हा अडकत जाऊन,
नव्याने जाळ विणतच आहे.

