सोनसळी चाफा
सोनसळी चाफा
गर्द गडद पिवळा सोनेरी,
सुगंध येता मन ही मोहरी,
गारुड करतो तनामनावर,
दिसे देखणा चाफा सुंदर
आसमंती या पसरे दरवळ,
सुवास येता पळते मरगळ,
रंग आगळा गंध आगळा,
सर्व फुलांतच दिसे वेगळा
पिवळा चाफा सोनपरी जणू,
घम घमती ती सोनसळी तनू
उन्ही कोवळ्या लाजुनी हसला,
हिरव्या पानी दडून बसला.
