जिजाईने घडवले छत्रपती
जिजाईने घडवले छत्रपती
मराठी मातीचा लावून टिळा
जिजाईने मांडला खेळ सारा
फेकून देऊन गुलामीचे लक्तरे
स्वराज्याचा घातला घाट सारा...१
संस्काराचे पाजून मोती
शिवबास घडवले
धर्म अधर्म सांगूनी भेद
सत्य हेच आचरण शिकवले....२
थोरामोठ्यांचा करावा सम्मान
पर स्त्री समजावी मातेसमान
रयतेच्या रक्षणा उभे रहावे
शस्त्र घेत बाळगून स्वाभिमान....३
बाळकडू दिले शिवबास
रयतेच्या राज्याच्या विचाराचे
जिजाई मोठी थोर
छत्र दिले महाराष्ट्रास शिवबाचे....४
महाराष्ट्राच्या पोटात जसा सह्याद्री
जिजाऊंच्या उदरी तसे शिवराय
पाहूनी स्वप्न स्वराज्याचे
छत्रपती घडवले महाराष्ट्र सावराय...५
