STORYMIRROR

Satish yanbhure

Abstract Tragedy

4  

Satish yanbhure

Abstract Tragedy

ढोंगी

ढोंगी

1 min
340

इथे सगळेच आहेत ढोंगी

बोली रोजच चढ्या भावाने लागते

ढोंगीपणा मिरवायची

आतलं लपवून बाहेरचं दाखवायची..


आणून साळसूदपणा बिनदिक्कत वावरतात

स्वतःला विचारुन तर पहा

ढोंग आहे का खरं मन

वावरणारं नेमकं कोण आहे जनांत..


स्त्री पुढारपणाच्या हाणून डिंगा

विद्वान म्हणून वावरता

कस्पटासमान वळचणीला पडलेल्या

घरच्या बाईला स्त्री स्वातंत्र्य काय असतं हे कधी विचारता...


ठेकेदार धर्माचे, पुरोगाम्यांचे

फुकात ज्ञान पेरतील

कधी मनाचा आरसा जर उघडून पाहिला

स्वतः चा काळा चेहरा पाहून एकट्यात लाजतील......


देशभक्तांचं पिक आलय

वाढतय भराभरा

काळे कारनामे करुन लाजवताना देशाला

यांचं काळीज कसं कापत नाही चराचरा..


सभ्यपणाची शेखी मिरवता

माणूसकीला विसरता

माणूस म्हणून घेताना

ढोंगीपणाखाली दबून मरता..


चिरीमिरीवर गब्बर होणारे

अन् चिरीमिरी देऊन रडणारे

इमानदारीच्या गप्पा झोडतात

दोघेही सारखेच सन्मानाचे सोहळे करतात साजरे


मुखवट्यावर मुखवटे

मुखवट्या खाली विद्रूपपणा

काळ्याकुट्ट मनास झाकून

अट्टाहास .. मला सभ्य म्हणा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract