शाळा
शाळा
जिवंत माझं जगणं
अन् उठून माझं दिसणं
होती माझी शाळा
जिने लावला होता मला लळा
अशी माझी शाळा
वाहणाऱ्या वाऱ्यावर
स्वार व्हायला शिकवणारी
होती माझी शाळा
जिने फुलवला होता आनंदाचा मळा
अशी माझी शाळा
जगायला शिकवणारी
धडपडण्यात आनंद शोधणारी
होती माझी शाळा
जिने दुखाच्या दुर केल्या होत्या कळा
अशी माझी शाळा
अंधारात प्रकाश दाखवणारी
मित्रांत रमवणारी
होती माझी शाळा
जिने दुर केली होती जीवनाची अवकळा
अशी माझी शाळा
हसत खेळत रमत
पुस्तके शिकत गेलो
क्षण सुखाचे वेचूनी
जगणे शाळेत शिकत गेलो..
अशी माझी शाळा..
चैतन्य नांदते
शाळेच्या कणाकणात
सृजनाचे बी रुजवते
कोवळ्या अतरंगी अंतरात
अशी माझी शाळा
अशी माझी शाळा
जिने लावला लळा.
