STORYMIRROR

Satish yanbhure

Inspirational

3  

Satish yanbhure

Inspirational

माणूस शोधणारा संत

माणूस शोधणारा संत

1 min
209

संत असा

होऊन गेला

माणसात देव शोधण्याचा

मंत्र देवून गेला

तंत्र मंत्र भितीचे अवजार

माणसाने निर्मियले

दगडरूपी देवाच्या नावाने

जनमानसात रुजविले..

फुकात सल्ले देण्याऐवजी

कर्म करून दाखवले

साफसफाई गावागावात करून

स्वच्छतेचे धडे दिले..

अंधश्रद्धेच्या दुनियेत

विज्ञान लोकांत रूजवले

भोळ्याबाबड्या जनतेस

सत्य असत्य पारखण्यास शिकवले...

किर्तनातून लोकांचे प्रबोधन केले

कर्ज काढून सणवार करू नये

अर्थकारण समजावून सांगितले

व्यसनाच्या नादी कोणी लागू नये ...

देवळात कोणी जावू नका

दिनदलीतात भेद मानू नका

गाडगेबाबा सांगून गेले

माणुसकीचा धर्म सोडू नका..

गंडेदोरे धुपदुपारे

अंध माणसाचे अवगुण

देव बरा साथ देईल धेंडांची

ज्यांच्या अंगी नसे वैचारिक सदगुण...

शिक्षणाचे जाणूनी महत्त्व सांगूनी गेले बाबा

एकवेळ कमी जेवा

बायकोला जुनंच लुगडं नेसाया सांगा

पण मुलाबाळांना शाळा शिकवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational