STORYMIRROR

Satish yanbhure

Others

4  

Satish yanbhure

Others

निरोपाला साज स्वागताचा

निरोपाला साज स्वागताचा

1 min
210

संपुनीया

वर्ष गेले

भले बुरे

देणे दिले

सुख सारे

हिरावूनी

दान दु:ख

ते देऊनी

ज्या आहेत

आठवणी

त्यांची केली

साठवणी

निरोपाला

स्वागताचा

साज आता

या वर्षाचा

भुतकाळ

शिकवतो

पुढे रस्ता

दाखवतो

आशेचेही

बिज रोवूं

अपेक्षांचे

झाड लावू

संकटाचे

आव्हानही

नवे नाही

आम्हासही

जीवनाचे

हे तराणे

गाऊ सारे

आनंदाने

चैतन्याचा

उजडावा

नवा दिन

तो असावा...


Rate this content
Log in