ज्ञानदीप
ज्ञानदीप
जीवनाचे
खरे मंत्र
शिक्षण हे
हेच तंत्र..१
समजून
गेली पार
चिमुकली
ज्ञान सार..२
उमलत
जाई कळी
नवामृत
घेई जळी...३
श्रीगणेशा
पाटीवर
नवांकूर
मांडीवर...४
गृहदषा
ते सोडले
गृह तारे
जे जोडले...५
अंधश्रद्धा
ती फेकली
अभ्यासाने
ती शेकली...६
खडू पाटी
जोडीदार
सानुली ती
शोभे पार...७
पेटे दिवा
प्रकाशाचा
ज्ञानदीप
तो ज्ञानाचा...८
