स्वप्नातले जग
स्वप्नातले जग
एक दिवस असा उजाडावा
उठावे रजनीच्या दुलईतून
निरभ्र निरपेक्ष नभाच्या कवेत
झोकावे स्वतःला मनातून..१
जावे स्वप्नांच्या जगात
फुलपाखरू होऊन
मकरंद वेचायला
इवलेसे पंख घेऊन....२
सुमनांचे घेऊन रूप
जावे सुगंध वाटाया
रंग घेऊनी नानापरी
जावे आनंद पेराया..३
खग होऊनी
बळ पंखात भरावे
गरजुंची आसवे पुसण्या
उंच नभात झेपावे...४
नसावे कोणी गरीब
उधळण व्हावी आनंदाची
दरी नसावी भेदाची
गुढी उभी रहावी मानवतेची...५
