तहानलेला कावळा
तहानलेला कावळा
एक होता कावळा
खूप खूप तहानला,
शोधामध्ये पाण्याच्या
खूप खूप फिरला
पाणी काही मिळेना
तहान काही भागेना,
तोंड झालं रडकं
दिसलं एक मडकं
मडक्यापाशी गेला
डोकावायला लागला,
पाणी दिसलं तळाशी
जाऊ कसा त्यापाशी
लागली तहान जास्त
युक्ती सुचली मस्त,
छोटे दगड मिळवले
मडक्या मध्ये जमवले
दगडांनी मडके भरले जसे
पाणी आले वर तसे,
पोटभरून प्यायला पाणी
आनंदून गायला गाणी
सोडले नाही प्रयत्न केले
म्हणून त्याने पाणी मिळवले,
आली अडचण केली मात
प्रयत्न वाया नाही जात
