Wapp Notifications!
Wapp Notifications!
मला खूप आवडायचे wapp notifications
न उघडता जाणून घ्यायचे मित्र मैत्रिणींचे संभाषण
कुणी पाठवलेले फुल कुणी पाठवलेला मेसेज,
तोकडा असला तरी notification मधे दिसतो लगेच!
पण एक दिवस काय मज्जा झाली सांगते,
एका मित्राने पाठवला मला लांब लचक संदेश,
मी notification मध्येच तो वाचला लगेच!
पाठवली होती forwarded कविता तुझ्या विना कसा मी राहू
तुझ्यासाठी व्याकूळ होऊन वाटते आता जीव द्याऊ!
मला forwarded दिसले नाही notification नी केला बाऊ!
मी त्या शब्दात हिर्वून गेले,वाटले इतका हा माझ्यावर करतो प्रेम
आता मी काय करू,कशे व्यक्त करू त्याला माझ्या मनाचे बेत!
ऑनलाईन ऑर्डर केली अंगठी त्याला surprise देण
्यासाठी!
त्याला आपल्या प्रेमाचे रंग आवर्जुन दाखवण्यासाठी!
त्याचे wapp उघडलेच नाही,उगाच बोलायचे नव्हते काही!
आंगठी मिळताच तो झाला अवाक,हे काय पाठवले वेडी काय
आपण दोघे फक्त मित्र आहोत हे तू विसरली काय?
मग ती कविता,ते व्याकूळ शब्दं कुणासाठी होते मित्रा?
अगं तू माझा chat उघड तर सही,ती forwarded होती कविता!
किती छान लीहली होती कविता,म्हणून तुला forward केली,
तू उगाच गैरसमज करून घेतलास तुझ्यासाठी नव्हती ती!
रागाने लालबुंद झाले,आला मित्राचा राग,
पटकन ब्लॉक केला मित्र,विझवली मनातली आग!!
म्हणून मित्रांनो,कधी notification वर जाऊ नका,
chat वर पाहिले आखा मेसेज नीट पणे वाचून टाका!