Wapp ची दुनिया
Wapp ची दुनिया
प्रत्येक नावाशी एक वेगळी कहाणी जुळली आहे
जेव्हा मी wapp chats वर scroll करते
नावाच्या बरोबर dp बघुन , मनात एक वेगळीच लहर सरते!
रोज dp बदलणारी मैत्रीण रिकामटेकडी वाटु लागते,
फुलांचा रंगबिरंगी image ठेवून,ताई सर्व भाऊ बहिणींशी बोलू लागते
Canada चा भाऊ,तिथल्या बरफा चे dp लावतो,
US ची आत्या,मुलाच्या अप्रतिम शाळेच्या बिल्डिंगचे चित्र लावते!
तीस वर्षांपूर्वी चा फोटो लावून,काका उगाच सर्वांचे कौतुक साधतात,
काकू मात्र देवाचे चित्रं ठेवून,मैत्रिणींच्या गप्पात हरवून जातात.
शेजारचा बंडू, धोणी चा dp लावून,क्रिकेट प्रेमी असल्याचा वाव आणतो.
हुशार गीता वर्गात प्रथम असली तरी,स्वतःचा hot selfie लावते
उगाच मग शाळेत boyfriends ची लिस्ट मोजत असते!
किराणा दुकानदाराला आपल्या दुकानाचा dp प्रिय असतो,
साडी चा विक्रेता ,ऐश्वर्या चा dp लावून आपल्या साड्याची जाहिरात करतो,
चशमेवाले रोहित चे बाबा ,रोज नवीन quote घालून,स्वतःला खूप ज्ञानी दाखवतात,
आमचे आईबाबा मात्र स्वतःचे सोलो dp लावुन,आपण किती independent आहोत हे दर्शवतात!
खरे तर हे सर्व आणि बरेच अजूनी माझ्या chat शी जुळलेले असतात
काही ना काही कारणाने माझ्या जीवनाशी संबंधित असतात
एकच wapp,आख्या दुनियेला सामावुन घेतो
विविध भाषा,जाती,देश असले तरीही,
Wapp वर मात्र आपण सर्व एक होतो!
