पहिला स्पर्श
पहिला स्पर्श
बऱ्याच यातना सहन करून आई जीवाला जन्म देते
त्या चिमुकल्या जीवाचे आवाज ऐकून, शरीराचे घाव विसरते!
ते धडपडून बाहेर आलेलं असतं,ती कापलेली नाळ,
ते अरूप शरीर,ना चेहऱ्याला आकार
या रूपाचे हकदार, फक्तं आईचे डोळे,
जे न लवता,टिपून घेतात बाळाचे हे रूप निराळे!
आणि जेव्हा आई च्या स्पर्शाने,त्या जीवाला शांतता मिळते
त्याला छाती शी धरून,गोंजारत,आई बाळाचे नाते बनते
क्षणाक्षणात होणारे बदल,त्या जीवाकडे आई राहते बघत
९ महिने गर्भात वाढून जो जीव आता राहतो तिच्या सोबत!
आता सर्व कडे बातमी पोचते,अभिनंदनाची गर्दी होते
बाळाचे बाबा,आजी आजोबा येतात,
' आपले बाळ' असे म्हणून त्याला हातात घेतात.
आता तो आई पासून लांब होतो,लोकांच्या मिठीत,हातात खेळवला जातो
तो' पहिला स्पर्श 'आईचा मात्र जगावेगळं नातं जोडून जातो!
