STORYMIRROR

Madhavi Karnik

Comedy

3  

Madhavi Karnik

Comedy

कोंबड्यांची Night Duty

कोंबड्यांची Night Duty

1 min
152

एकदा एका कोंबड्याला मिळाली night duty

सर्व शेतातल्या कोंबड्यांना कोहल्या हून वाचवण्याची

कोंबडा खूपच आळशी,झोप त्याला प्रिय होती

आणि सकाळी सर्वात पहिले उठून त्याला दुनिया उठवायची होती!

आता night duty म्हणजे लागलीच सारी वाट

कुठे आत्ता उठता येणार पहाट होयच्या आत?

कसा बसा तैयार झाला रात्र पाळी साठी

डुलक्या देत बसला शेताच्या फळक्याशी.

कोंबड्या आपल्या पिल्लांच्या सोबत झोपल्या निश्चिंत मनी

तेवढ्यात नेहमी प्रमाणे आला तो कोहला चोरून

आत शिरला तरी कोंबड्याला आले नाही कळून 

झोपेतच जोरात कुकुडू कू ओरडला तो

काहीतरी आवाज झाला वाटले पहाटच जो

आवाज ऐकून घाबरला कोल्हा ,लगेच तेथून निसटला

एकही कोंबडी या पिल्लू त्या रात्री जखमी नाही झाले

शूरवीर कोंबडयाला सर्वांनी नावाजले!

आत्ता मात्र कोंबडा night duty मध्ये अडकला

पहाटेचा थाट आत्ता त्याचा निसटला!

केव्हातरी दुपारी जर तुम्हाला कोंबड्यांचा आवाज ऐकू येईल

तो night duty वालाच कोंबडा आहे ह्याची तुम्हाला खात्री होईल !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy