क्षण
क्षण
क्षणात पापण्या मिटतात, क्षणात दिवे विझतात,
क्षणात जीव जन्मतो,एका क्षणात डाव कोसळतो,
क्षणात डोळे भिडतात,क्षणात प्रेम होते,
क्षणात चेहऱ्यावर स्मित पसरते ,क्षणात अश्रू वाहते
क्षणात लाख विचार,लोभ,दुस्वास, करुणा नाहीतर नुसता राग!
क्षणात आपले जग,एका क्षणात एकटेपण,
क्षणात आनंद ,एका क्षणात हिरमुड,
क्षणात कुरकुर,क्षणात मौज!
केवढे ओझे घेऊन येतो प्रत्येक क्षण आपल्या कडे,
सर्वांना वेगळे अनुभव देत ,दिवस रात्र चौहीकडे,
कधीच रिकाम्या हाताने क्षण येत नाही
गुलाबी,काटेरी ,कशे का असो,दुःखाचे,आनंदाचे ,काही का हो,
क्षण आपला रोज नियमाने सर्वांकडे येतो,
आपल्या विचारांच्या अनुसार, तो आपल्यावर हे लादून जातो!
दुखः, भीती,राग,अविश्वास, ईर्ष्या, कूकर्म आदी अनेक
नका दाखवू कधी क्षणाला, नाहीतर हेच पदरी क्षण आपल्या वाहेल!
चला तर पुढल्या क्षणाचे आनंदाने करू आगमन,
सुंदर होईल जीवन सर्वांचे,प्रसन्न होईल प्रत्येक क्षण!
