मनाचा वाढदिवस
मनाचा वाढदिवस
मनाचा वाढदिवस मनाला ठाऊक नाही, ते किती वर्षाचं असतं, कधी लहान बाळा सारखं तर कधी वयस्कर असतं. इथुन,तिथून अनुभवांचे वार, त्या कोमल मनावर होत असतात, क्षणात बहरून, क्षणात हिर्मोडून,मनात रोजच् वेगळे खेळ चालत अस्तात. कुणी म्हणतं आजोबा झाले तरी मनाने मात्र लहान च आहेत, तर कुणी लहान वयातच मनानी प्रौढ झालेले असतात मग नक्की मनाचे वय काय? शरीरास सारखे मन दर वर्षी वाढते काय? असंख्य बेजार करणारे प्रश्न लीहले, तर माझे मालाच वय सापडले! अहो,मन हे सर्वांकडे असतं, पण त्यात डोकावणारे विचार, क्षणात ३-४ हजार, बनतात मनाचे आधार! म्हणून रोजच् आपले मन जन्म घेतं, वयाने दर वर्षी मोठे झालो तरी, मन मात्र रोजच वाढदिवस साजरा करत असतं!
