STORYMIRROR

Vasudha Naik

Others Children

4  

Vasudha Naik

Others Children

प्राणी सभा

प्राणी सभा

1 min
370

जंगलात भरली प्राण्यांची सभा

मनसोक्त खेळण्याची मिळाली मुभा....


हत्तीदादा अगडबंब आला पहिला

सोंड हलवत नुसताच उभा राहिला.....


दुसरी सवारी आली काळ्या अस्वलाची

घाई त्याला ऐटीत दगडावर बसायची...


नाचत नाचत फुलवत रंगीत पिसारा

ऐटीत पाय दुमडत आला मोर तिसरा..


चार पायांवर मारत छान उड्या

चौथे आले माकड काढत खोड्या....


हंबरत, हंबरत, डुलत गाय पण आली

पाचवा नंबर तिचा ती रवंथ करत बसली....


भू,भू,भू ,भू करत कुत्रा आला

माकडाशी गप्पा मारण्यात दंग झाला...


म्याँव म्याँव करत रानमांजर आले

सातव्या रांगेत गुपचूप जावून बसले...


आठवा आला कोल्हा खूप खूप दुरून

सर्व सवंगडी एका जागी भेटतील म्हणून.....


नववे आले गाढव गळा घालून हार 

सभेसाठी त्याने अथांग नदी केली पार....


डरकाळी फोडत वाघोबा दहावे आले

क्षणात सारे प्राणी त्याला पाहून धूम पळाले.....


Rate this content
Log in