STORYMIRROR

Shivam Madrewar

Children Stories Classics

4  

Shivam Madrewar

Children Stories Classics

लहानपण दे रे देवा....

लहानपण दे रे देवा....

2 mins
402

किल्ला बांधायला मला लाल माती दे रे,

त्याच किल्ल्यांमधून इतिहास दाखव रे,

छत्रपती शिवरायांचे विचार शिकव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


माझ्या आजीला लुकलुकत्या ताऱ्यांमध्ये दाखव रे,

अमावस्येच्या चंद्राला पुन्हा येण्यास सांग रे,

“सुर्याला रात्री कुठे लपतोस?” विचार रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


सुरेश भटांची कविता चालात गातो रे,

साने गुरूजींचे सुविचार दररोज वाचतो रे,

गणपती बाप्पांना सदैव नमन करतो रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


सकाळी-सकाळी गाईचे दुध पाठव रे,

माझ्या मराठी मातीत मला खेळव रे,

सायंकाळी आईच्या कुशीत झोपव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


लिहिण्यासाठी पाटी-पेन्सील दे रे,

सरस्वती मातेचे मला दर्शन घडव रे,

विद्येच्या महासागरात मला बुडव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


माझ्या बाबांना खाऊ आणण्यास सांग रे,

“गल्लीतल्या दोस्ताला लपाछुपी खेळतो का?” विचार रे

पण मला दररोज शाळेत पाठवू नको रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…

तहानलेल्या डोळ्यांमध्ये आनंद आण रे,

मंदिरातल्या दिव्याने सुद्धा वाट दाखव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


साहित्याला गुण द्या
लॉग इन