STORYMIRROR

Shila Ambhure

Comedy

3  

Shila Ambhure

Comedy

थांब गं बाई

थांब गं बाई

1 min
1.5K



थांब गं बाई घरात जराशी

थांब गं बाई थांब।।धृ।।


अशी कशी तू भूललिस गं

डिस्काउंटच्या मागे लागलीस गं

मन उगा भागे ,फिर बरं मागे

बरी नाही घाई,थांब।।1।।


दोन दोन कपाटे भरली गं

तरीही हौस तुझी उरली गं

साडी सेल जिथं,तू असती तिथं

जागा दूजी नाही,थांब।।2।।


मुलांची तयारी मी करतो गं

जेवणाचे सारे मीच बघतो गं

तूही कधीतरी ,कर भाजी पूरी

काम करावया,थांब।।3।।


एकटाच बागेत मी जातो गं

हिशोबाची गाणी मी गातो गं

डोळा येते पाणी,दूर माझी राणी

जवळ बसाया,थांब।।4।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy