STORYMIRROR

Gauri Kale

Comedy Inspirational

4  

Gauri Kale

Comedy Inspirational

दुनियादारी

दुनियादारी

1 min
288

जीवन आहे गंमत भारी

फसवणूक आहे दारो-दारी 


माहित असतं पुढे आहे खड्डा 

तरी त्यात पडण्यात असते मज्जा 


कसली नाती अन कसलं काय 

इथे तर फक्त फायदा आणि एक कप चाय 


वरून असणार उसासारखी गोड

गरज संपली कि म्हणतात " आता मला सोड " 


गजब आहे लोकांचा फंडा 

दुसऱ्यांच्या घरी वाकून बघतात सोडून स्वतःचा काम-धंधा


सिनेमातले कलाकारांचे असतात फॅन 

पण माय-बापासमोर तेच फॅन बनतात सुपरमॅन


वय नसून पण लिहतात लव्ह-लेटर

नंतर पोरींच्या मागे लागून बनतात वेटर 


नको जेवण नको पाणी 

हातात हवा मोबाईल आणि हेडफोन लावून गाणी 


आई पुढे मांडतात शब्दांचे डोंगर 

आणि बायको समोर होतात मांजर 


शिकून घ्या आगळी वेगळी दुनियादारी, 

इथे फसवणूक आहे दारो-दारी ! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy