STORYMIRROR

Gauri Kale

Inspirational

3  

Gauri Kale

Inspirational

विश्वास

विश्वास

1 min
473

विश्वास म्हणजेच कवच आहे 

ज्यावर जीवन सारे अवलंबून आहे 

नाती ज्यानी जोडली जातात 

त्यानीच माणसे जवळ येतात॥


ठेवला तर सुखी जीवन 

तोडला तर पाप आजीवन 

वेळेला कमी येणारा

सत्याच्या मार्गावर असणारा॥


निवड विचारांवर आधारित 

फळ कर्मांशी निगडित॥


कमावणे अत्यंत कठीण 

परंतु गमावणे सहज सोप्पे 

कमवायला लागेल वेळ 

पण गमवायला पुरणार नाही एक क्षण ही वेळ॥


वृक्षासमानच असते, जिला वाढायला वेळ लागते 

वाढल्यावर त्याचे फळ ही भेटते 

जपले तर होते सोनं 

नाही तर तुटली जातात मनं॥


जे मागून भेटत नाही,

ती स्वतः कमवावी लागते म्हणजेच "विश्वास"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational