STORYMIRROR

Gauri Kale

Others

3  

Gauri Kale

Others

आई

आई

1 min
249

आजच्या माझ्या कवितेची,

सुंदर सुरुवात तू ...

जन्म घेता पोटी तुझ्या, 

माझ्या मुखातील पहिले शब्द तू ...

वेदना नंतरची माझी, 

घेतलेली पहिली हाक तू ...

घराला घरपण आणणारी, 

आम्हा लेकरांची माऊली तू ...

स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून, 

पुरवलास माझा प्रत्येक हट्ट तू ...

रोज नव्याने बहरलेल्या, 

अंगणातील पवित्र तुळस तू ...

भव्य मंदिराची,

उंच कळस तू...

प्रकाश देणाऱ्या समईतील, 

जळणारी ज्योत तू... 

जीवनातील पहिले संस्कार,

आणि पहिली गुरु तू ...

मायेची सागर अन 

खडतर वळणांवरील माझा आधार तू... 

हृदयाच्या स्पंदनेतील,

प्रतयेक श्वास तू ...

या सुंदर जगात,

माझ्या विश्वासाची प्रतिमा तू ...

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवरील, 

दुःख विसवणारा प्रवास तू... 

रणरणत्या उन्हातली, 

माझ्या मायेची सावली तू ...

रिमझिम बरसणाऱ्या पावसातील, 

मनी भिजवणारा ओलावा तू...

असेल प्रगती माझी,

पण त्या मागील किमया तू ... 

माझ्या या आयुष्यातील, 

सुंदर सुखाची बाग तू ...

भाग्यवान आहे मी,

कारण देवाने दिलेली सुंदर भेट आहेस तू ...

तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ, 

आहेस माझी आई तू !


Rate this content
Log in