एक रात्र काळोख्यानी भरलेली
एक रात्र काळोख्यानी भरलेली
सरला होता दिवस
झाली होती रात्र
निजणार होते काही वेळात
चंद्र तारे बघत आकाशात॥
खूप होते दमली
पण सुंदर नाभाकडे पाहून, सुखावत होते मी
अचानक एक भयानक स्वर कानी पडला
चोहीकडे काळोख पसरला॥
घाबरून गेले मी
अस्वस्थ होऊ लागले
आठवण आली आईची
उणीव भासू लागली तिच्या छायेची॥
जाणीव झाली मला
कि एक दिवस गरज होती अशीच माझ्या आईला
भरून आले मन
पण गेला होता तो क्षण॥
ध्यानात आले माझ्या
आठवणी झाल्या ताज्या
चूक झाली माझी
गरज असताना मातेला, कामात होते व्यस्थ मी॥
जर धरला असता तेव्हा हात तिचा
तर असती सोबत आज माझ्या
अश्रू आज थांबत नाहीत
झालेल्या चुका भरून निघणार नाहीत॥
माफ कर आई मला
जवळ घेशील ना तुझ्या लेकराला
तू खूप महान आहेस
तुझी माया सागरासमान आहे॥
धन्यवाद त्या ऐकू आलेल्या स्वरा ची
जिच्या भीतीमुळे जाणीव झाली चुकीची
कळून चुकले मला
किती दुखावले मी माझ्या जननी ला॥
तेवढ्यात जणू मायेचा हात आला डोक्यावरी
पाणावले डोळे आणि पडला प्रेमाचा झरा माझ्यावरी
थोर आहे प्रेम आईचे
पडू लागले स्वर अंगाईचे॥
आश्चर्य वाटले मला
जरी जागी नाही, तरी एकट सोडले नाही लेकराला
आभार कसे मनू तिचे
ऋण फेडता येणार नाही त्या जन्मदात्रीचे॥
