STORYMIRROR

Gauri Kale

Inspirational

3  

Gauri Kale

Inspirational

धागा मैत्रीचा ...

धागा मैत्रीचा ...

1 min
229

धागा मैत्रीचा,

रंग रूप व वयाचं बंधन नसणारा

धागा मैत्रीचा,

दुर असताना ही मनाशी जोडला गेलेला

धागा मैत्रीचा,

कधी स्वतः रुसणारा तर कधी हसवणारा

धागा मैत्रीचा,

मैत्री शब्द ऐकताच त्याचे नाव स्मरण करवणारा

धागा मैत्रीचा,

सुख दुःखात सामील असणारा

धागा मैत्रीचा,

चुकत असेल वाट कधी तर योग्य मार्ग दाखवणारा

धागा मैत्रीचा,

भांडलो जरी तरी एकमेकांशिवाय न करमणारा

धागा मैत्रीचा,

कुठल्या ही परिस्थितीत कायम सोबत उभा राहणारा

धागा मैत्रीचा,

प्रेम, विश्वास आणि जिव्हाळानी भरलेला

धागा मैत्रीचा,

तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू राहू न शकणारा

धागा मैत्रीचा,

इतके अतुट की कृष्ण आणि सुदामाची घट्ट मैत्री दर्शवणारा

ज्या नात्याला कधीही कोणताच अंत नसणारा,

धागा मैत्रीचा ...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational