STORYMIRROR

Gauri Kale

Others

3  

Gauri Kale

Others

नात

नात

1 min
222

नात असो कोणतेही

पण त्यात असावा जिव्हाळा 

समजून नेहमी एकमेकांना 

ठेवून कायम प्रामाणिकपणा...


अनमोल असतात नाती 

मनी नसतात कुठल्या तक्रारी 

ऐकून कधी तिसऱ्याचे

ना करावे क्षणात नाहीसे...


असावा कायम विश्वास 

ना पडावे कमी कधी प्रेमाचा सहवास 

समोरच्याचे मन जपावे असे 

कि नाती आपोआप व्हावे आपले ...


विसरुन दुःख स्वतःचे 

नेहमी प्रयत्न करावे समोरच्याला ठेवायचे हसरे 

लावावा जीव निस्वार्थ 

न बाळगता मनी कुठलेही स्वार्थ...


अहंकार नसावा कधी 

कारण गर्वाचे घर असते नेहमी खाली 

जेव्हा येतात नात्यात तुझे-माझे 

तेव्हा सुरु होतात विरहाचे काटे...


जरी तोडायचे प्रयत्न केले इतरांनी 

अतूट असावी नाती जी बांधली जातात केवळ विश्वासानी 

म्हणूनच नातं असो कोणतेही 

पण ती निभावण्याची धमक असावी कोणत्याही प्रसंगी॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन