रागवले आहे मी...
रागवले आहे मी...
हो आज रागवले आहे मी
कारण तुमच्यासाठीच चिंतित आहे मी
निराश आहे आज मन माझे
किंमत नाही मानवाला निसर्गाचे
तूच तर बीज पेरून जन्म दिले मला
आणि तूच तुझी गरज संपल्यावर कापून टाकले तुझ्या वृक्षाला
प्राणवायू होते मी तुझी
सावली तुला देऊन उन्हाचे चटके सोसत गेले मी
आसरा होते पक्ष्यांची
काळजी होती त्यांच्या घरट्यांची
माझी मूक भाषा नाही सांगू शकले तुला
वाटले होते समजून घेशील मला
तुझ्यासाठीच होते पाने, फळे व फुले
विसरून उपकार तू , संपवले मला तुझ्या स्वार्थामुळे
मला दुःख होत आहे
तुझ्यापासून दूर जाण्याचे
अश्यानी कसे राहील पर्यावरण संतुलित
जर जोडले नाही गेले माझी मुळे या जमिनीत
घेऊ शकाल का ताजा श्वास?
जर नसेल उद्या माझा सहवास
काळजी आहे मला तुमच्याच भविष्याची,
जगू द्या मला तरच तुम्ही ही जगाल संतोषानी !
