STORYMIRROR

Gauri Kale

Others

3  

Gauri Kale

Others

स्त्री-शक्ती

स्त्री-शक्ती

1 min
254

स्त्री म्हणजेच साक्षात त्रिमूर्तीचे वरदान आहे 

ती जननी आहे, तीच शक्ती आहे 

तिच्यापासून जीवन सारे सुरक्षित आहे॥


तिलाही पंख आहेत,

तिचेही काही स्वप्न आहेत॥

तिलाही हक्क आहे,

कारण तिच्यातही जिंकण्याची जिद्द आहे॥


ती अनाथांची माउली आहे, ती जन्मदात्री आई आहे... 

ती जिवलग मैत्रीण आहे, ती साथ निभावणारी पत्नी आहे ... 

ती मायेची सावली ताई आहे, ती धनाची पेटी मुलगी आहे ... 

ती एक सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर सारे काही व्यर्थ आहे॥


तिचे सुख तर कायम तिच्या कुटुंबाच्या सुखातच असते,

ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून स्वतःचा परिवार खुलवते॥ 

तिच्या कुटुंबाच्या वाटेत आलेले काटे ही स्वतः सोसते,

ती आदीशक्ती आहे, द्रुष्टांचा संघार करणारी वाघीण आहे॥


तूही घे उंच भरारी... 

तुझी किमया आहे सगळ्यात न्यारी ... 

तुझ्यात आहे शक्ती भारी ... 

उजळून टाक दुनिया सारी॥


Rate this content
Log in