आयुष्य
आयुष्य
वहीतील पहिले पान म्हणजे जन्म
आणि शेवटचे पान म्हणजेच मृत्यू॥
मधली पान असतात रिकामी
ती भरायची असतात आपल्याच कर्मांनी॥
करावे सर्वांचे भले, जोडून ठेवुनी सर्व नाते
विसरून मतभेद सारे, बांधुन मनाचे धागे
गाळून चुकीचे पाने, गाऊया एकजुटीने गाणे॥
हसत हसत जीवन करावे सफल
पडलो चालत असताना तरी धैर्याने वाढवावे मनोबल॥
न खचता जावे दुःखास सामोरी
तेव्हाच भेटेल सुखाची शिदोरी॥
रात्र संपल्यावर दिवस तर उजाडणारच आहे
तसेच जीवनामधील अंधकार गेल्यावर प्रकाश ही येणारच आहे॥
विधात्याच्या पुढे चालणार कुणाचे काय
मोजले जाणार आहे पाप-पुण्याचे घडे, संपता जीवन अध्याय॥
जे पेरणार आहे
तेच उगवणार आहे॥
सुंदर अश्या निसर्गाकडून
आपल्याला हेच शिकायचे आहे॥
कारण चुकतो तो माणूस
आणि सुधारतो तो देवमाणूस आहे॥
असे जीवन एक चक्र आहे
ज्यात मागे न सरकता पुढे चालत राहायचे आहे॥
काही नसते येताना, एकटे असतो आपण
मोहात न अडकता, उघडावे माणुसकीचे झाकण॥
कर्म करावे चांगले, जिंकून सर्वांची मने
सार्थ करून जीवन हे सुंदर आयुष्य जगावे॥
