STORYMIRROR

Gauri Kale

Romance

3  

Gauri Kale

Romance

अंतर

अंतर

1 min
262

हरवली कुठे माझी राधा,

शोधू कुठे मी तिला

ती निराश आहे माझ्यावर,

संकोच आहे तिला माझ्या प्रेमावर 


कसे सांगू तिला,

तिच्याविना करमत नाही मला 

जीव आहे शरीरात,

पण मन मात्र फक्त तिच्यात 


सहन होईना दुरावा,

आशा आहे तुझा सहवास मिळावा 

नको जाऊस अशी लांब,

माझ्यापाशी जरा थांब 


समजाऊ कसे तिला,

ती जीव आहे माझा

तिच्याविना नाही काही जीवनात,

ती असेल तर अर्थ आहे आयुष्यात


विश्वास आहे मला,

तडा जाऊ नाही देणार प्रेमाला

येईल पुन्हा ती,

"अंतर" नाही येणार आमच्या मध्ये ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance