STORYMIRROR

Sonam Thakur

Comedy

4  

Sonam Thakur

Comedy

नवरा आणि लॉकडाऊन

नवरा आणि लॉकडाऊन

1 min
603

लॉकडाऊनमुळे झाला चांगला बदल

नवऱ्याला आता चांगलीच घडली अद्दल


जो कायम असायचा मित्रांच्या घोळक्यात

तो आता सापडला माझ्या विळख्यात


आठवला मला मोदींचा नारा

त्यांना म्हटलं आता गुपचुप घर आवरा


त्यांना ही पटला माझा विचार

कारण बाहेर पडला तर मिळेल लाठीमार


यशस्वी झाली माझी चाल 

एक कप चहा ने केली कमाल


वरून दिली बिस्कीट दोन 

म्हटलं काम करा गपचूप धरून मौन


जेवणात आता ना मिळे कोंबडी ना मटण

रोज डाळ भात खाऊन घटले त्यांचे वजन


करी तांडव कोणीतरी द्या रे वडे

मिसळ आणि भजीच्या आठवणीने मन झाले वेडे


धुतले कपडे स्वच्छ केले घर

प्रेमाने सांगितलं की मदत करतात मला मिस्टर


सायंकाळी मग मी ही केली त्यांची विश पुरी 

जेवणाच्या ताटात त्यांच्या वाढले वडे आणि चिकन करी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy