घरचा पाहुणा उठेना
घरचा पाहुणा उठेना


करोना नावाचा अनाहूत
पाहुणा आला
सगळे जग घरी थांबले
त्याची सरबराई करायला
नखरा तरी किती त्याचा
म्हटला कोणाचे तोंड
पाहणार नाय
मग सर्वांनी स्वतःचेच
झाकून घेतले तोंड हात पाय
.. लोकांना याचा सासुरवास
करायला लावतो योगा
नाही तर म्हणतो
आपल्या कर्माची फळे भोगा
कधी मागतो दूध हळद
कधी नुसते गरम पाणी
मसाल्यांचे काढे करून
सांभाळली जाते याची वाणी
नवीन कपडे आवडतात त्याला
टोपी ऍप्रन ग्लोज मास्क
नाहीतर म्हणतो पाठविन इस्पितळात
एवढेच आहे माझे टास्क
सॅनीटायझरने करतो
दोन्ही टाईम अंघोळ
नाही तर मग घालतो
शिवाशिवीचा घोळ
निसर्गाची फिरली लहर
कोरोना ने केला कहर
जिभेचा फोड काही फुटेना
घरचा पाहुणा उठेना