माझं नागपुरी खेड
माझं नागपुरी खेड
पाऊस म्हणते मी अन
थंडी म्हणते मी जशी
मायच्या न बायकोच्या
भांडणात माई फजिती
कचाकचा भांडत आहे रातदिन
छत्री घेऊ की स्वेटर घालू
स्वेटर घालू की छत्री घेऊ
नाही लागत दिमाक चालू
या दोघांनीही माय
डोकस सार दुखवल
स्वेटर फेकला छत्री फेकली
अन् वाकळीत तोड खुपसले
यायच्या झगड्याचा
राग मले कायले
झगडा तुम्ही रतदिन
जातो मी पिक्चर पायले