बालपणाची मैत्री
बालपणाची मैत्री
बालपणाची ती मैत्री
नाही पडत रे मागे
असे निरागस नी भोळी
जनु रेशमाचे धागे
बघ चाचपून मन
असे काना कोपऱ्यात
तुझी गोड ती आठवण
नेई तुझं बालपणात
मग हसशील गाली
डोळे ओले हि होईल
तुझ्या मनाचा पाखरू
सख्याला भेटुनी येईल
मनी खेलशिल पुन्हा
विटी दांडू नी लगोरी
खोटा संसार खेळाचा
त्यात बाहुली ती गोरी
असेल ही तो कोठे
गुंग संसाराच्या मधी
विचारी तुझी आठवण
आता भेटशील कधी
झाला असशील मोठा
असे तू मोठ्या पदावरी
जेव्हा भेटेल तो मित्र
गळा भेटुनी तू मी करी
