हिवाळ्याची संध्याकाळ
हिवाळ्याची संध्याकाळ
हिवाळ्याची संध्याकाळ
नाही देत बाहेर बसू
नाक थंडीने गारठले
हातपाय लागे कापू
थंडीच्या या संध्याकाळी
शॉल ओढून मी बसले
हातात चहाचा कप माझ्या
मनात विचार नाही कसले
हिरव्या पानाच्या आडोशाला
चुळबुळ करे वाटे काही
मी वाकून तव पाहिले
फुलपाखरू निजले बाई
निळ्या आभाळी दिसला
शुभ्र बगळ्यांचा थवा
सुंदर रांगेत हो उडती
मला वाटे त्यांचा हेवा
आज कुणाची ही गाय
अंगणात होती बसली
लागलय अंधार पडून
आज घरी नाही गेली
चिमणीने पिल्यास दाणा
आपल्या चोचीने भरविले
थंडीने कुडकुडते पिल्ले
तिने पंखाखाली घडविले
या रम्य संध्याकाळी सारे
कसे घरात बघा घडले
झाड फुलं वेली पान पान
कसे दवात हो भिजले
