महामारी (कोरोना)
महामारी (कोरोना)
माणसातला माणूस
कसा रोज मरत आहे
त्या मेल्या माणसात
मी ही सामील आहे
प्रेम नी निष्पापपणा
माझे कवचकुंडल आहे
काही कळेना मजला
मी कोठे दवडले आहे
बिना पाण्यानी माणूस
मज समोर मरत आहे
माणुसकीने भरलेली घागर
मी रस्त्यावर ओतत आहे
काय झाले काही कळेना
माणूस माणसाकडे वळेना
मदतीच्या हाताला ही
तो हात आज देईना
अस्पृश्याचे धडे मी
रोज शिकत आहे
माणूस मी माणसाशी
चुकीचे वागत आहे
महामारीचा क्रूर राक्षस
थैमान माजवत आहे
माणसातला माणूस तो
निर्दयी रोज मारत आहे
मदतीला तत्पर असा मी
लोकांना ढकलत आहे
तडफडून मरतांना मी
माझ्यानां बघत आहे