जगू द्या तिला
जगू द्या तिला
न कापड कोंबु तोंडात
नको गळा तिचा दाबू
जिवंत पोर तुझी ते
नको कचऱ्यात फेकू
गडद अंधारी सोनूलीला
नकोस सोडून जाऊ
काय दोष त्या बापडीचे
नको तिचा सूड घेऊ
रडत असेल माऊली तिची
लागला असेल पान्हा झरू
भुकेने तीही व्याकुळ असेल
लागली असेल पिल्लू रडू
काय झाले असते आईला
तुझ्या असेच मारले असते
तुझ्यासारख्या नराधमाचे
अरे जन्मच झाले नसते
जन्म दिले स्त्रीने तुला
स्त्री वाढते अन तू खातो
वासनेच्या सैतानाला तिज
जवळ जाऊन शांत करतो
मुली होत्या त्याही कुणाच्या
त्यांच्या जीवावर तू जगतो
हेही रक्त तुझेच लेका
मुलात अस काय बघतो