STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy

का असे वाटते मला..

का असे वाटते मला..

2 mins
250

जगापासुन खुप साऱ्या गोष्टी मी लपवितो,

सायंकाळी बसुन त्या मी तुलाच सांगतो,

तुझ्यासमोर मी माझे मन मोकळे करतो,

का असे वाटते मला,

की माझे मन बोलवित आहेत तुला.


दिवसभर संगणकामध्ये डोके घालतो,

सायंकाळी मात्र तुझ्या बद्दल विचार करतो,

झोपताना मी तुझाच फोटो पाहून झोपतो,

का असे वाटते मला,

की माझे ह्रदय आठवते तुला.



कामामध्ये भल्यामोठ्या चुका करतो,

त्याच्या दुःखामध्ये मी हरवून जातो,

आनंद तर माझ्या काळजातुनच निघतो,

का असे वाटते मला,

की आनंद बोलविते तुला.



खुप काही मी तुझ्या वरतीच लिहीतो,

कवितेमधुन मी प्रेमाचे गीत गातो,

माझे प्रश्न त्या कोऱ्या कागदांना विचारतो,

का असे वाटते मला,

की माझे शब्द रडविते तुला.



माझ्या कविता तु दररोज वाचते,

त्याबद्दल तु तुझे मत व्यक्त करते,

माझ्या काव्यसंग्रहात तु हरवते,

का गं असे वाटते मला,

की मी दररोज आठवतो तुला..?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance