STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

माझ्या प्रेमाचा अंतहीन प्रवास

माझ्या प्रेमाचा अंतहीन प्रवास

2 mins
630

काहीशी अनपेक्षितच होती, माझ्या प्रेमाची सुरुवात

तुझा घेतलेला ध्यास अन, तुझ्या नकळत तुझ्यासोबतचा प्रवास

तुला सांगायला ओठांवरच, अधीर झालेले भाव

अन तुझ्या डोळ्यांतल्या लाटांमध्ये, अडखडणारी नाव


एक एक दिवस मोजता मोजता, सरत गेलेली वर्ष

तुला आठवताना होतोय फक्त, माझ्या वेदनांचा खर्च

क्षणभर विचार करून, एक पाऊल पुढे टाकलं

तुला मागणी घातलेल्या क्षणांनी, सारं आयुष्यचं माझं व्यापलं


तुझ्या आठवणींच्या विळख्यात, गुंतलेलं माझं मन

असता तू समोर, माझ्यापासूनही दूर जायचं दोन क्षण

अशामध्ये आपणा दोघांत, एकाएकी दुरावा आला

आपल्यात रमणारा निसर्ग, क्षणांत अबोल झाला


तुझ्या सकारात्मकतेची वाट बघत, मी स्वतःला समजावलं

तिच्या उत्तराला वेळ आहे अजून, असं मनाला ठणकावलं

दररोजच्या भेटीगाठी आपल्या, आता आणखीनच तुटक झाल्या

तुला पाहण्यासाठी होताहेत रोज, पापण्या माझ्या ओल्या


माझं प्रेम कसं निर्मळ आहे, हे मी तुझ्यासमोर मांडत होतो

तुला माझ्या जीवनी आणण्यासाठी, प्रचंड शक्ति सांडत होतो

तरीही नियतीने माझ्या प्रेमाचा, जणू खेळचं मांडला होता

तू माझा श्वास असतानाही, मी माझा श्वास कोंडला होता


एके क्षणी कदाचित माझा प्रेमनिषाद, तुझ्या मनी उमटला

पुन्हा माझ्या प्रेमाचा पालव, नवचैतन्याने बहरला

सुरू झाला तुझ उत्तर मिळवण्यासाठी, गुंतलेल्या प्रश्नांचा खेळ

अन जाऊ लागला तुझ्या आठवणीत, माझा सर्व वेळ


मग माझ्या प्रेमावर, तुझ्या नकाराचा घाला आला

जिथे माझ्या आयुष्याचा, जवळपास शेवटच झाला

तरीही मनात ठेवून, त्या सर्व कडव्या आठवणी

गेलो खूप दूर, आता मी तुझ्यापासूनी


आता हळूहळू मी, भानावर येत होतो

आयुष्याच्या रूळांवर, पुन्हा सुरळीत होत होतो

पुन्हा तुझ्या इच्छेखातर, आपली भेट झाली

अन छाटलेल्या माझ्या प्रेमवेलीवर, पुन्हा फुलांची बहर आली


तुझ्या मनी मित्र म्हणून, पुन्हा मला वाव मिळाला

पण तुझ्या जीवनी परतण्याचा, भाव माझा निमाला

कारण माझ्या जीवनात आता तू, मला पूर्वीसारखी भासत नाहीस

काही विचारलं तर कुठेतरी हरवतेस पूर्वीसारखं हासत नाहीस


तूच सांग कसं आवडेल, तुझ्या मित्राला तुझ अस हरवणं

वास्तव वाटणार्‍या भावनांना, मनातल्या मनांत जिरवणं

ठरवलय आता मी, तुझ्या भविष्यातून दूर कुठेतरी वसणं

पण तुझ्या शिवायही सोबत असावं, तुटलेलं माझं स्वप्न



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy