तेव्हा तुला मी miss करतो
तेव्हा तुला मी miss करतो
फोर्टचा परिसर
ऑफिसहून परतताना
एकटाच असतो जेव्हा
आभाळ भरून येतं
गार वारा सुटतो
अन् मुसळधार पाऊस कोसळायला लागतो
मी आडोशाला थांबतो
अन् उजेडात दिसणारे पाऊसथेंब न्याहळतो
तेव्हा ...!
तेव्हा तुला मी miss करतो
संध्याकाळी वाटणारी हुरहुर
गार सुटलेली झोंबणारी हवा
मरीन ड्राइव्हचा गोलांकित किनारा
सभोवताली विखुरलेले लोक
काही एकमेकांत गुंतलेले
काही मोकळ्या हवेत सुटलेले
मी एकटाच उभा
हातातले शेंगदाणे तोंडात टाकतो
अन् दूरवर समुद्र न्याहाळतो
तेव्हा...!
तेव्हा तुला मी miss करतो
लोकलची विंडो सीट
कानात हेडफोन
त्यावर वाजणारं अरिजितचं गाणं
...ये दिल ठहर जा जरा
फिर महोब्बत करने चला है तू!
गाडी वाशी खाडीपुलावरुन धडधडते
अन् मी खिडकीतून दूरवर उभ्या होडीला न्याहाळतो
तेव्हा....!
तेव्हा तुला मी miss करतो
रुपेरी पडद्यावर
सिनेमा संपताना
प्रेम राग द्वेष प्रेम
याचं मिश्रण पाहताना
मी ही जातो हरवून
ओल्या डोळ्याने ती म्हणते
आता ही आपली शेवटची भेट
तेव्हा मलाही अस्पष्ट दिसायला लागतं सभोवतालचं जग
मी बाजुच्या रिकाम्या खुर्चीला न्याहाळतो
तेव्हा...!
तेव्हा तुला मी miss करतो
