तिला मात्र याची खबरही नसायची
तिला मात्र याची खबरही नसायची


तिची येण्याची तीच वेळ होती
त्या अगोदर तो दहा मिनिट
त्या चौकात थांबायचा
ती यायची आपल्या विचारात
अन जायची आपल्याच विचारात
तो तिला पहात राहायचा
तिला मात्र याची खबरही नसायची
ती त्याला भेटायची
खुप खुप बोलायची
हसायची खिदळायची
त्याची गंमत करायची
पण हे सार घडायचे
स्वप्नात त्याच्या!
तिला मात्र याची खबरही नसायची
त्या दिवशी ती दिसली नाही
तो अस्वस्थ झाला
मग बरेच दिवस ती दिसलीच नाही
तो मात्र नियमित चौकात यायचा उभे राहायचा
तिची वाट पहायचा
तिला याची खबरही नसायची
एका दिवशी ती त्याला दिसली
काहीशी अशक्त झालेली
चेहरा पडलेला
चालण्यात शिथिलता
तिला तशा अवस्थेत पाहुन तोही थकला
p>
त्याचेही डोळे पानावले
तिला मात्र याची खबरही नव्हती
त्या दिवशी नेहमी सारखच घडल सार
तो उभा चौकात
ती आली अन हळुहळु चालत पुढे गेली
पुढे गेल्यावर ती थांबली
अन तिने मागे वळून पाहील
तो तिथेच होता
तिला पाठमोरी पहात उभा राहीलेला
तिने त्याला नजरेन बोलविले
तो संमोहीत होऊन तिच्याकडे गेला
तिने त्याच्या डोळ्यात पाहुन म्हटलं
मला घरापर्यन्त सोडशिल?
थोडस गरगरल्या सारख वाटतय"
त्याने रीक्षा थांबवून तिला बसविले
तिच्या शेजारी तोही बसला
विश्वासाने ती मागे मान टाकुन रेलली
तिचा सहवास त्याला सुंगधीत करुन गेला
मोगरा फुलला होता
स्वप्नातून सत्यात तो शिरला होता
तिला मात्र याची खबरही नव्हती