माझे बालपण मला परत द्या!
माझे बालपण मला परत द्या!


बागेत उगवलेली फुले
उनाड माळरानावर फुललेली फुले
सारखीच
मुले आणि फुले
सारखीच
आठवणींच्या गल्ली बोळात शिरताच
मला भेटत माझ बालपण...
सुंदर निरागस
शर्टाच मधल बटन तुटलेल
चड्डीचे दोन बटणे निखळलेल
मस्त भटकायच दिवसभर खेळायच..
आपल्याच तंद्रीत
आभाळात डोलणारा पंतग तासनतास न्याहळायचा
खाडीत उतरुन लहानस्या ओंजळीत मासे धरायचे
माझ बालपण असच होत
शाळेतुन घरी निघताच वाटेतच पाऊस गाठायचा
भिजत पाऊसात साचलेल्या पाण्यात उड्या मारायचो
अन भिजायला मिळाव म्हणुन छत्री घरीच विसरायचो
रेनकोट अन दप्तर पाठीवर घेवुन
हळुहळु साचलेल्या पाण्यातुन मुद्दामहुन चालायचो
मस्त होत यार ते दिवस !
देठेसर म्हणायचे बाळ तु अभ्यास कर
खुप मोठा माणुस होशील
निंबधाच्या वहीचा सुंगध
वहीसोबत जपायचो
फाटकबाई खुप प्रेमळ होत्या
बाई कुठे ब-याचदा आईच वाटायची ती!
मला शिकवणारे ते करारी डोळे
आता कुठे असतील?
कधी कधी हा प्रश्न मला पडतो
अन मी काहीसा भावनिक होतो
कल्याण बेसुरात देशप्रेमीच गाणं गायचा
मी लाकडी बेंच वाजवुन ताल धरायचो
अजुन आठवतयं
बच्चनच्या चित्रपटाचे हीरवे टीकीट
अँडव्हान्स बुकींगने काढलेले असायचे
कंपास पेटीत गुप्तपणे दडवुन ठेवलेले असायचे
अन हळुच गुलाबाच्या पाकळ्या हुंगाव्यात
तसा आठवडाभर हुंगायचो
रात्री नऊच्या खेळाला कुंटुंबासोबत
दादाचा"बोट लावीन तिथ गुदगुल्या" पाहीला होता
तेव्हाही दादाचा विनोद आवडला होता
त्यात चावटपणा असतो हे कळायच वय नव्हतं ते
सगळं कस मस्त वाटायच यार!
त्या वेळी थंडी जास्त पडायची
बहुदा मोकळ्या खाड्या पटांगणे
अन मर्यादित लोकसंख्या मुळे असावे बहुधा !
अशा थंडीत अख्खी वस्ती बाहेरच झोपायची
अन कीशोर वयीन पोरं
रात्रभर भटकायचे
शेकोटी पेटवुन गप्पा रंगायच्या
विषय काहीही असायचे
No censorship
एकमेकाचे अनुभव कथा
यातुनच पोरांचे सामाजिकरण घडायचे
काही पोर घडायची तर काही बिघडायची
याला काही मोजपट्टी नव्हती
रस्त्यावरील पडद्यावर पावसात भिजत शोले पाहीला होता.
सकाळी पाच पर्यत चालला होता.
खरच अदभुत वाटावे असेच दिवस होते ते!
कीशोर वयात चांदोबा वाचायला आवडायचे मला
राणीचा महल...उडती चटई
सुंदर राजकन्या ..बाटलीतला राक्षस
या कथानी माझ भावविश्व समृद्ध केले होते
भावनाना पंख अन स्वप्नांना जिवंत केले होते
शब्दांना दृष्यांकीत करण्याची जादु
इथेच शिकलो मी
मनाला भुरळ पडावी असत होत यार ते सारं!
पण आता...सारच बदललय
आता मुलाच्या हातात नसतात पुस्तके
असतो मोबाईल.
त्यात सारच दृश्य स्वरुपात उपलब्ध असत
मग सांगा काय गरज त्यांना power of imagination ची ?
electronic वस्तुत लहापण बदीस्त झालेली पोरं
घेवुन बसतात मोबाईल तासन तास
त्याच बालपण त्याच पालक चालक शिक्षक
सारच होत चाललाय मोबाईल!
पण यामुळे त्यांना आकाशाचे बदलणारे रंग कसे कळतील ?
इंद्रधणुष्याच सौदंर्य कसे जाणवेल ?
बालपण ही मानवाला मिळालेली अप्रतिम देणगी
अशी कशी गमवत चाललोय आपण
ज्या वयात निरागस प्रश्न विचारावेत
त्या वयात चिंतागस्त झालेले मुल दिसतात
ज्या वयात खेळाव भांडाव उड्यामाराव्या
त्या वयात घरात कोंडलेली मुल
ब्यु व्हेलच्या नादी लागतात
कुठे चाललोय आपण?
माधुरीच धकधक वर लहानगी थिरकते
प्रेम गीतावर पोर हुबेहूब नाचतात
कीती कौतुक करतो आपण त्यांचे
पण का त्यांना आपण प्रदान करीत आहोत अकाली प्रौढत्व
सिरीयल चँनलवाले यांची टी आर पी साठी चाललेली धडपड
अन मुलांनी अव्वल नंबर मिळवावा
यासाठी चाललेली पालकांची धडपड
बालपण उध्वस्त करीत राहते मुलांचे?
बालपण खरच सुंदर असते
तो बालकांचा आधिकार आहे
त्याना खेळु द्याव बागडू द्याव
एवढच मला सांगायचय
कीती सुंदर आहे हे गाणं !
माझी संपत्ती घ्या
तारुण्यही घ्या
हव तर सर्वस्व घ्या
...त्या बदल्यात फक्त माझं बालपण मला परत द्या!!