2020 निरोप देतांना
2020 निरोप देतांना


2020 निरोप देतांना
चीनचे वुआन ओस पडल्याचे दृश्य बातम्यात पाहताना वाटायचे
हे सार खुप लांब घडतय
त्याचा आपल्याशी काही संबध नाही
कोरोना आपल्याकडे कधीच येणार नाही
पण हे सार खोट ठरल तुझ आगमन नेमकच झाल होत
मोठे स्वप्न घेवून लोक वावरत होते
पण तू आलासच हातात मोठा टाळा घेवून
संपूर्ण देशाला टाळा लावून चावी तु आपल्या खिशात ठेवलीस
जाता जाता चावी फेकलीस आमच्याकडे आता कुठे देशाचा दरवाजा उघडलाय
तस यावर्षी सारच भंयकर होत
बाहेर पडायच नाही
हात धुवायचे मास्क लावायचा
सतत भीती
थोडासा खोकला आला तर भीती वाटायची
त्यात अँब्युलसची सारखी वाजणारी सायरनजीव मुठीत घेवून जगत राहीलो आम्ही
कंपन्या कारखाने गाड्या सारेच बंद होते
परीणामी हवा प्रदुषण विरहीत झाली होती
पण अशी ही शुध्द हवा माणुस घेवू शकत नव्हता
कारण त्याला मास्क वापरणे सक्तीच केल होतं
खरे मरण झाले ते हातावर पोट असणाऱ्या मजूरांचे
सरकार म्हणतय घरातच रहा
पण ज्यांना घर नव्हती त्यांनी काय करावे?
ते निघाले शेकडो मैलाची पायपीट करीत
आपल्या मुळ गावाकडं
उपासी पोटी पोर खाद्यावर घेवून
ओझे उचलुन चालणारे मजूर रस्तो रस्ती दिसले
आणि आपण १९४७ चा फाळणीचा भारत पाहतोय की काय असेच वाटले....
"दुःख
वाटले काळीज तुटले" हे शब्द फार निकामी वाटले तेव्हा
दुष्काळात तेरावा महीना म्हणतात तसे
त्याच काळात आले चक्री वादळे
ब़ंद घराच्या खिडक्यातून उडालेले पत्रे
आभाळाला भिडलेली धुळ माती
उरात धडकी भरवणारी होती
अनेकाचे घरे उध्वस्त झाली
स्पर्श केला तर कोरोनाचा संसर्ग
वादळाचा तडाखा
बाहेर पडावे तर कोरोना
घरात राहावे तर उपासमार अशा भयानक स्थितीत आणून ठेवल होतस तू
सरकार मात्र थाळ्या वाजवून दिवे लावत होतं
वर्षाच्या शेवटी कडक थंडीत कृषी बिलाच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी भेटले
यात ऐशी वर्षाचे युवक होते
जे थंडीतही शेतमालाला हमीभाव असलाच पाहीजे यासाठी लढत होते
कोरोना संकटात मंदीर मस्जिद सारेच बंद होते
बंद झाली नाही माणुसकी
अनेक ठिकाणी माणस माणसांना मदत करीत असलेली दिसली
मानवता हाच श्रेष्ठ धर्म हा संदेश तुच दिलास
त्यामुळे तू जो अनुभव दिलास तो वाईट होता
अस म्हणण्यापेक्षा तू बरच काही सक्तीने शिकवलस... सांगितलस
जर माणसाने ते ऐकल नाही तर पुन्हा अशाच समस्यांना तोंड द्यावे लागेल
...तुला निरोप देताना मी शांत आहे...
नवीन वर्षाच स्वागत करताना नक्कीच मला संयम पाळावा लागेल.
पण तरीही तितक्याच उमेदीने
मी नविन वर्षाच स्वागत करतो....
स्वागत २०२१
नविन वर्ष सुख समृद्धीचे जावो