STORYMIRROR

Raju Rote

Others

3  

Raju Rote

Others

जिथे भय नसते तिथे प्रेम असते

जिथे भय नसते तिथे प्रेम असते

1 min
1K


युरोप मला खुप सुरक्षित वाटायचा

तिथला कायदा अन् सुव्यवस्था

पुढारलेल्या विचाराचे लोक

विकसित आरोग्य सेवा

पण जगात सर्वोत्तम आरोग्य सेवा व्यवस्था असलेल्या 

इटालीत कारोनाने थैमान घातले

अन माझा भ्रमाचा भोपळा फुटला


मला चीन खुप शक्तीशाली वाटायचा

अणुबाँम्व हँड्रोजन बाँम्ब

कडक शिस्त...प्रचंड लोकसंख्या 

त्याचा योग्य वापर

पण तिथे कारोना आला

अन वुहान सारखे शहरे उध्वस्त होत गेली

अन माझा भ्रमाचा भोपळा फुटला


अमेरिकेत तेच झाले

बाकी देशाचही तसेच आहे


भारतात तर विचारायला नको?

इथे अगोदरच घडत होत झुंडशाहीच दर्शन 

धार्मिक दंगली जातीय विषमता 

आता यात भर कोरोनाची पडली

समाधानाची गोष्ट 

इथे अजूनही माणस अन माणुसकी जिवंत आहे


मी विचारात पडलो ..

जगात सर्वात सुरक्षित जागा कुठली असावी?


अचानक मला उत्तर सापडलं

आपल्या प्रिय व्यक्तीची उबदार मिठी

होय...हीच सर्वात सुरक्षित असते

तिथे कुठलच भय नसते

जिथे भय नसते तिथे प्रेम असते

जिथे प्रेम असते तिथे भय नसते


Rate this content
Log in