मी तुझ्या प्रेमात पडलोय
मी तुझ्या प्रेमात पडलोय


मी तुझ्या प्रेमात पडलोय!
तो म्हणाला " मी तुझ्या प्रेमात पडलोय!
ती म्हणाली" खोटं बोलायला काही मर्यादा असाव्यात!
तो म्हणाला."तुझ्या शिवाय जगण कठीण आहे
ती म्हणाली "स्वताचे कपडे स्वता धुत जा
अन स्वयंपाक करायच शिकुन घे"
तो म्हणाला.."तूझ्या डोळ्यात मी हरवुन जातो
ती म्हणाली "नंबर तपासुन घे!
तो म्हणाला "तुला फोन नाही केला तर दिवस माझा जात नाही"
ती म्हणाली "टाईम पास करायला आणखी काय काय करतोस?
तो म्हणाला "चल, पाऊसात भिजुया!
ती म्हणाली "थांब,पहीली छत्री घेवुया!
तो म्हणाला "चौपाटीचा डुबणारा सुर्य पाहुया!
ती म्हणाली "चल, घरी लवकर जावुया!
तो म्हणाला "अस कीती दिवस चाल
ायचं?
ती म्हणाली "जो पर्यंत तुला कंटाळा येत नाही!
तो म्हणाला "चल जा! खुप झाल तुझं ,डोक खावु नकोस!
ती म्हणाली हसत "कीती कीती प्रेम करतोस तु माझ्यावर!
तो हसला अन म्हणाला,मुल काँलेज मधुन आली नाहीत अजुन?
ती म्हणाली "दोन तप कशी वेगाने निघुन गेली कळलच नाही!
तो म्हणाला "तुझे रुपेरी केसही तेवढेच सुंदर दिसतात
जेवढे तुझे काळेभोर मोकळे केस दिसायचे!
ती म्हणाली "तु तेव्हाही तरुण होतास अन आताही आहेस!"
तो हसला अन म्हणालो..माझं तुझ्यावर बिल्कुल प्रेम नाही!
ती म्हणाली "माझ तुझ्यावर होत,.. आहे आणि राहिल!
तो काही बोलला नाही!
अन ती ही काही बोलली नाही!
कधी कधी शांतताच जास्त बोलकी असते!